मुंबई : माझ्या वडिलांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना विनंती करून वाशिम जिल्हा निर्माण केला. वाशिम जिल्ह्यात शिवसेना माझ्या वडीलांनी रुझवली. त्यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पराभव करून या मतदार संघावर आपला हक्क निर्माण केला होता. त्यांच्यानंतर मी खासदारकीच्या माध्यमातून दोन दशकाहून अधिक काळ हा मतदार संघ बांधलाय. अशावेळी अचानक तुम्ही निवडणूक लढवित नाही ही भावना अस्वस्थ करणारी असते पण पक्षाचा आदेश माझ्यासाठी मोठा असून माझी नाराजीची भावना दूर सारत मी राजश्री पाटलांच्या प्रचारात उतरणार अशी ग्वाही वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी आज दिली. गवळी यांनी लोकसभेबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
भाजपा कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध असल्यामुळे पाच वेळा खासदार झालेल्या भावना गवळी यांना यंदा एकनाथ शिंदे यांना तिकीट नाकारून राजश्री पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली होती.
“प्रचाराला निघाले नाही, म्हणून मी नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. पण मला स्पष्ट करायचय की, नाराज होणाऱ्यापैकी मी नाही. मला खंत जरुर वाटली. कदाचित थोडसं खंत असल्यामुळे मी बाहेर पडले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. एकनाथ शिंदेंची हात मजबूत करण्यासाठी मी मैदानात उतरणार आहे”, गवळी म्हणाल्या.
भावना गवळी म्हणाल्या, मोदींचा नारा 400 पारचा आहे. त्याला आम्ही साथ देणार आहोत. आम्ही सर्व सहकारी जयश्री ताईंना विजयी करण्यासाठी घौडदौड करणार आहोत. शिवसेनेची जिल्हाप्रमुख म्हणूनही मी काम केलं आहे. मी ठरवलं असत तर मला अनेक पद उपभोगता आली असती. पण मी पदांसाठी काम केलं नाही. माझ्यासाठी काही आहे आणि काय नाही, हा माझ्यासाठी गौण विषय आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.