नागपूर : आमदार बच्चू कडू यांनी महायुतीवर आणखी तीव्र प्रहार केला आहे. अमरावतीमध्ये प्रहारचा उमेदवार रिंगणात उतरविल्यानंतर रामटेकमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. आता कडू यांनी नागपूरच्या निवडणुकीतही उडी घेत काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनाही पाठिंबा जाहीर केला आहे.
काँग्रेसच्या हजारीपहाड येथील सभेत प्रहारचे नागपूर शहर अध्यक्ष अमोल इसपांडे यांनी काँग्रेस नेत्यांकडे समर्थनाचे पत्र सोपविले. भाजपने सहकारी पक्षांना योग्य सन्मान दिला नाही. बच्चू कडू यांचा अपमान करणाऱ्या नवनीत राणा यांना भाजपचे तिकीट दिले. भाजपला चढलेली सत्तेची नशा उतरविण्यासाठी प्रहारतर्फे समर्थन देत असल्याचे इसपांडे यांनी जाहीर केले.