कल्याण : ‘ख्रिश्चन एकता सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी, तसेच फादर्सनी माझी भेट घेत कल्याण लोकसभा क्षेत्रात ख्रिश्चन समाजासाठी ‘ख्रिश्चन भवन’ उभारण्यासह अन्य मागण्या मांडल्या. त्यावर ख्रिश्चन समाजाशी सकारात्मक चर्चा केली. या सर्व मागण्यांचा शासनदरबारी पाठपुरावा करून तातडीने त्या मार्गी लावण्याचा शब्द दिला’, असं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. याप्रसंगी ख्रिश्चन एकता सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जितू राठोड यांच्यासह डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ शहरातील सर्व सन्माननीय पास्टर्स, फादर्स उपस्थित होते.
