अनिल ठाणेकर

ठाणे : जोपर्यंत भारत देश अस्तित्वात आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे संविधान अबाधित राहिल. भारत देशाची एकात्मता आणि अखंडता ही बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे. आजच्या दिवशी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करीत असताना परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आणि ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा मंत्र, हा विचार अधिकाधिक प्रसारित करण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते करीत आहेत. असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी बाबासाहेबांना अभिवादन करताना काढले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानलव, बोधिसत्व, परमपूज्य, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी, १४ एप्रिल, २०२४ रोजी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, झेड विंग, फ्लॉवर व्हॅली कमर्शियल कॉम्प्लेक्स, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे (पश्चिम) येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन तसेच कोर्टनाका, ठाणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी अभिवादन केले. यावेळी ‘भारतीय संविधान निर्माते डाॅ बाबासाहेब आंबेडकर अमर रहे’, ‘डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ या राष्ट्रवादी काँग्रेस कार्याकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी कोर्ट नाका परिसर दुमदुमून गेला होता.

यावेळी ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विरु वाघमारे, युवक कार्याध्यक्ष संदेश पाटील, जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस रविंद्र पालव, परिवहन समिती सदस्य मोहसीन शेख, नितीन पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुजय सावंत, दिनेश मेहरोल, मनोज कोकणे, अतुल कदम, संतोष सहस्त्रबुद्धे, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, समीर पेंढारे, निलेश फडतरे, शंकर कोळेकर, निलेश कापडणे, प्रभाग अध्यक्ष समीर शेख, साहिल सुर्यवंशी, महिला विधानसभा अध्यक्षा सुवर्णा खिल्लारी, अरुणा पेंढारे, वंदना खानोलकर, ब्लॉक अध्यक्षा शामा भालेराव, लक्ष्मी वैती, प्रिया वाघेरा, मनिषा कांबळे, राणी कटारनवरे, पुजा खोपडे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष हुसेन मणियार, सोशल मिडीया सेल अध्यक्ष कल्पेश मिठबावकर, विद्यार्थी विधानसभा अध्यक्ष केतन माने, विद्यार्थी ब्लॉक अध्यक्ष हर्ष चापले, विद्यार्थी पदाधिकारी मुर्शिद खान आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *