अशोक गायकवाड
कर्जत : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त कर्जत नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी रविवारी,(दि.१४) नगरपरिषद कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी कार्यालय अधीक्षक रवींद्र लाड, लेखापाल स्वामिनाथ खारतोडे, विद्युत इंजिनियर सुनील लाड, कल्याणी लोखंडे,जयेश घरत,रुपेश पाटील बापू बहिरम कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
