जल प्राधिकरणाच्या पाणी नियोजनामुळे
माथेरान : माथेरान मध्ये मागील काही दिवसांपासून गर्मीने डोके वर काढले असताना माथेरानला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत या तलावात असणारे पाणी माथेरान पर्यटन नगरीला पिण्याकरता पुरवठा केला जातो व हे पाणी कमी पडत असल्याने नेरळ येथून पंपिंग द्वारे माथेरानला जादाचा पाणीपुरवठा करण्यात येतो त्यामुळेच या पर्यटन हंगामामध्ये माथेरान कराना पाणी टंचाईस सामोरे तर जावे लागणार नाही ना याची चिंता सर्वांना लागून राहिली आहे परंतु जल प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या सूनियोजित नियोजनामुळे पाणीटंचाई सध्या तरी जाणवत नसल्याने सर्वत्र समाधान होत आहे.
काही वर्षांपूर्वी माथेरान मध्ये या तलावातून पूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असे व एन पर्यटन हंगामामध्ये येथे भीषण पाणीटंचाई सामोरे जावे लागत असेल परंतु नेरळ येथून माथेरान करतात जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर माथेरानकरांनी पाणीटंचाईपासून मुक्तता झाली होती परंतु मे महिन्याच्या शेवट शेवटला मात्र पाणीटंचाई सामोरे जावे लागते परंतु यावर्षी नेरळ येथून होणार पाणीपुरवठा समाधानकारक असल्याने व शालेय मध्ये मुबलक पाणीसाठा सध्या उपलब्ध असल्याने माथेरानकरांना अजून तरी पाणी टंचाईस सामोरे जावे लागलेले नाही परंतु जल प्राधिकरणाने नेरळ येथून होणाऱ्या पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या पंपांची दुरुस्ती योग्य प्रकारे करून ठेवल्यास मे महिन्यामध्ये होणाऱ्या पाणीटंचाई पासून माथेरान करांना दिलासा निश्चित मिळणार आहे.
माथेरान मध्ये मे महिन्यामध्ये पूर्वी होणारी पर्यटकांची गर्दी मागील काही वर्षांमध्ये कमी झाल्याने पाण्याचा वापर ही कमी झाला आहे त्यामुळे या दिवसांमध्ये माथेरान करांना पाणीटंचाई जाणवत नाही परंतु काही भागांमध्ये मात्र पाणी मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी होत असतात जल प्राधिकरणाने दोन महिने आधीपासूनच प्रत्येक सोमवार व मंगळवार या दोन दिवशी विविध भागात पाणी पुरवठा बंद केला असल्याने सध्या माथेरान मधील तलावात पाणी उपलब्ध आहे त्यामुळेच येणाऱ्या पर्यटन हंगामात माथेरानकरांना पर्यटन हंगाम असाच राहिला तर पाणी टंचाई सामोरे जावे लागणार नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
