मुंबई : नव्या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत देशातील प्रमुख 8 शहरांत मिळून एकूण 1,20, 640 घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक घरांची विक्री मुंबईत झाली आहे. पहिल्या 3 महिन्यांत मुंबईत 41, 590 घरांची विक्री झाली आहे. दुस-या क्रमांकावर पुणे शहर असून पुण्यात एकूण 23,110 घरांची विक्री झाली आहे.

विशेष म्हणजे या गृहविक्रीच्या माध्यमातून तब्बल 1,10,880 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गृहविक्रीमध्ये 41 टक्क्याची वाढ झाली असल्याचा खुलासा प्रॉपटायगरडॉटकॉमच्या रियल इनसाइट रेसिडेंशीयल – जानेवारी–मार्च 2024’ अहवालातून झाला आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील 8 प्रमुख शहरांत 85,840 घरांची विक्री झाली होती. गृहविक्रीमध्ये हैदराबाद (14,290), अहमदाबाद (12,920), बंगळुरू (10,380), दिल्ली-एनसीआर (10,060), चेन्नई (4,430) आणि कोलकाता (3,860) या शहरांचा क्रमांक लागतो.

गेल्यावर्षीच्या तुलनेत 2-24 च्या पहिल्या तीन महिन्यांत गृहविक्री मूल्यात सर्वाधिक वाढ दिल्ली एनसीआर 12,120 कोटी (149 टक्के) मध्ये झाली असून यानंतर हैदराबाद 23, 580 कोटी (143 टक्के), अहमदाबाद 9,090 कोटी (130 टक्के), कोलकता 2,000 कोटी (59 टक्के), बंगळुरू 11, 310 कोटी (52 टक्के), पुणे 15,159 कोटी (32 टक्के), मुंबई-एमएमआर 34,340 कोटी (31 टक्के), आणि चेन्नई 3,290 कोटी (22 टक्के) या शहरांचा क्रमांक लागतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *