सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे गद्दार आहेत, 2019 ला मोदींचं नाव सांगून मत मागितली आणि जिंकून आल्यावर मुख्यमंत्रीपदासाठी मोदींशी गद्दारी केली अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

शरद पवारांसोबत गेल्यावर शिवसेनेची काय अवस्था झालीय, शरद पवारांना शिवसेना संपवायची होती. बाळासाहेबांनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली नाही, पण उद्धव ठाकरे सोनिया गांधींना मुजरा करतात, असं वक्तव्य करत नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला आहे.

नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे गद्दार आहेत, 2019 ला मोदींचं नाव सांगून मत मागितली. मोदींच्या नावावर खासदार आणि आमदार निवडून आले.  देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विनंत्या केल्या, मग संधी साधली शरद पवारांनी त्यांना शिवसेना संपवायची होती, त्यांनी मुख्यमंत्री पदाचं चॉकलेट उद्धव ठाकरे यांना दिलं. शिपाई होऊ शकत नाहीत,त्यांना मुख्यमंत्री करतो म्हटल्यावर बाळासाहेबांचं कर्तृत्व सोडलं आणि राष्ट्रवादी काँगेस बरोबर सरकार स्थापन केलं.

शरद पवारांसोबत गेल्यावर शिवसेनेची काय अवस्था झालीय. डोळ्यासमोरून 40 आमदार गेले, काही करू शकले नाहीत. बाळासाहेबांची असली शिवसेना होती, आता उद्धव ठाकरे यांचीच नकली शिवसेना आहे. बाळासाहेबांनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली नाही. उद्धव ठाकरे सोनिया गांधींना मुजरा करतात, असं म्हणत नारायण राणेंनी जहरी टीका केली आहे. खरे बाळासाहेब, हिंदुत्व, अभिमान, त्याग करणारे होते, उद्धव ठाकरे नकली, विकले जाणारे असल्याचं वक्तव्य राणेंनी केलं आहे.

पंतप्रधान मोदींना एका व्यासपीठावर बोलावत, काय काम केलं ते सांगतो म्हणणारे, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात गेले हे त्यांचं काम. मोदींनी केलेल्या कामांची यादी पत्रकारांना दया, उद्धव ठाकरे यांनी मोदींनी काय केलं असं विचारलं की तोंडावर मारा. उद्धव ठाकरे सायकिक केस, असल्याची खोचक टीकाही राणेंनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *