मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास दोन अज्ञात युवकांनी गोळीबार केला. घराच्या दिशेने त्यांनी चार राऊंड फायर केले. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट निवासस्थानाबाहेर ही घटना घडलीय. फेसबूकवरून बिष्णोई गँगने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. याबाबत वांद्रे पोलीस, गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम तपास करत आहेत.

सलमान खानच्या घराबाहेरील सीसीटीव्हीचा डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यापूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांना घराबाहेर सकाळी जॉगिंग करत असताना 2022 मध्ये एक चिठ्ठी द्वारे धमकी देण्यात आली होती. यामध्ये ‘मुसेवाला जैसा कर देंगे’, असं लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे सलमान खानची सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पिस्तूलचं लायसन्स देखील देण्यात आलं होतं. तसेच खाजगी सुरक्षारक्षकांमध्ये देखील वाढ करण्यात आली होती. नोव्हेंबर 2023 मध्येही धमकीचा ईमेल ही आला होता. त्यात पुन्हा आता गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *