ठाणे : अप्प्पर ठाण्यातील श्वानप्रेमींना आता आपल्या श्वानांची काळजी घेणारे हक्काचे डॉग हाऊस उपलब्ध झाले आहे. अंजूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील माणकोली-अंजूरफाटा मार्गावरील रामनगर परिसरात नव्याने सुरु करण्यात आलेल्या डॉग हाऊसचे अलीकडेच उदयॊजक आणि समाजसेवक लालचंद्र रामचंद्र पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल हर्ष केनेल्सचे दुर्वास करावकर म्हणाले बालपणापासून मला श्वानाबद्दल प्रेम आहे. माझ्या बेला या श्वानाला विविध डॉग शोजमध्ये बक्षिसे मिळाली आहेत. अप्पर ठाण्यात श्वानांची काळजी घेणारे कुठलेही डॉग हाऊस नव्हते. हि कमतरता भरून काढण्याचा विचार मागील चार वर्षांपासून मनात घोळत होता. आता हि मनीषा प्रत्यक्षात अवतरली आहे. या डॉग हाऊसमुळे केवळ अप्पर ठाण्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील इतर श्वानप्रेमींची अडचण दूर होईल. या हर्ष केनेलसच्या उदघाटन समारंभास सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, लघु उद्योजक किशोर नाखवा, प्रतिभा पाटील, ज्योती नाखवा आदी मान्यवर उपस्थित होते. प्रल्हाद नाखवा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अशोक पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *