नागपूर: भाजपचं संकल्प पत्र नाही तर मोदीजींची गॅरंटी आहे. नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर काय करायचं ते संकल्पपत्रात मांडण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तसेच काँग्रेसचा जाहीरनामा फेल आहे. ते कधीच आश्वासन पूर्ण करत नाही. काँग्रेससाठी जाहीरनामा कागद आहे. आमच्यासाठी मोदींची गॅरंटी आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. या वेळी चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. ते नागपुरात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुढची पाच वर्ष 80 कोटी नागरिकांना रेशन मोफत देण्याचा संकल्प आहे. 70 वर्षावरील नागरीकांना युनिव्हर्सल मोफत उपचार देण्याचा निर्णय झाला आहे. तृतीयपंथींयाचाही आयुषमान भारतमध्ये समावेश करण्यात आला आहे. सिलेंडरची पद्धत्त कालबाह्य करुन पाईपने गॅस देण्याचा निर्धार आहे. एक कोटी घरांना सोलरची सयंत्र देऊन त्याचं विजेचं बील मोफत करणार आहे. मुद्रा योजनेत 60 टक्के महिलांना त्याचा लाभ मिळाला आहे.मुद्रा योजनेची मर्यादा 20 लाख करणार आहे.
