महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदाच्या वर्षी ७० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र कॅरम असोसिएशन एका विशेष कॅरम स्पर्धेचे आयोजन  करणार असून या स्पर्धेचे पुरुष गटाचे पहिलं पारितोषिक ७० हजार रुपयांचे असणार आहे. पंच मार्गदर्शन शिबीर, खेळाडू प्रशिक्षण शिबीर, स्नेह संमेलन, वर्षभरात विविध स्पर्धांचे आयोजन व दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफीचे आयोजन असा भरगच्च कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. सन २०२४-२५ या कार्यकालाकरिता महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या सर्व राज्य स्तरीय स्पर्धांमध्ये सुरको नॅचरल राऊंड फ्रेमचे कॅरम व सिसका लिजंड स्पेशल एडिशन सोंगट्या वापरण्यात येणार आहेत. शिवाय २०२४-२५ वर्षांमध्ये राष्ट्रीय संघास देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा व खेळाडूंच्या कामगिरीनुसार देण्यात येणाऱ्या रोख पुरस्कारांच्या रकमेतही वाढ करण्यात येणार आहे.

सन २०२४-२५ चा अंदाजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे

१)  ४ ते ६ मे २०२४ – महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व क्षात्रैक्य युनियन क्लब आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धा, दादर, मुंबई.

२)  २५ ते २७ मे २०२४ – मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन राज्य मानांकन कॅरम स्पर्धा, बोरिवली, मुंबई.

३)  ११ व १२ मे २०२४ – एल. जे. ट्रेनिंग सेंटर, दादर, मुंबई – ४०००२८ येथे पंच मार्गदर्शन शिबीर.

४)  ८ ते १० जुन २०२४ – ८ वी श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट राज्य मानांकन कॅरम स्पर्धा, नरसोबावाडी, कोल्हापूर.

५)  २० ते २२ जुलै २०२४ – ३ री द चेंबूर जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धा, चेंबूर, मुंबई.

६)  ऑगस्ट २०२४ – ५८ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा, रत्नागिरी.

७)  ऑगस्ट २०२४ – स्नेह संमेलन व विशेष राज्य स्तरीय कॅरम स्पर्धा, मुंबई.

८)  सप्टेंबर २०२४ – कै विनायक निम्हण राज्य मानांकन कॅरम स्पर्धा, पुणे.

९)  ऑक्टोबर २०२४ – ३ री एम. आय. जी. क्रिकेट क्लब राज्य मानांकन कॅरम स्पर्धा, मुंबई.

१०) नोव्हेंबर २०२४ – राज्य मानांकन कॅरम स्पर्धा, जिल्हा – सिंधुदुर्ग.

११) डिसेंबर २०२४ – २ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी.

१२) सब – ज्युनियर व ज्युनियर खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबीर.

१३) डिसेंबर २०२४ – ५८ वी ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

१४) डिसेंबर २०२४ – ५८ वी सब – ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा.

१५) जानेवारी २०२५ – २ री घाटकोपर जॉली जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धा, विद्याविहार, मुंबई.

१६) फेब्रुवारी २०२५ – १६ वी शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धा, दादर, मुंबई.

१७) मार्च २०२५ – ६ वी रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर राज्य मानांकन कॅरम स्पर्धा, विलेपार्ले, मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *