नवी मुंबई : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागा अंतर्गत गीता दुबे व एस.आर. दुबे,शॉप नं 8,9,10, भूखंड क्र 85 सेक्टर-03, कोपरखैरणे, नवी मुंबई , हार्दिक सुनिल गोखरू व  प्रेमप्रकाश भवंरलाल शर्मा, शॉप नं 14,15,16, कासा ब्ल्यानका सो,भूखंड क्र 85 सेक्टर-03, कोपरखैरणे, नवी मुंबई यांनी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतरित्या बांधकाम केले होते. त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 53(1)अ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. त्याअनुषंगाने सदर बांधकामावर निस्कासनाची कारवाई करण्यात आली व त्यापोटी रु.10,000/- एवढी वसूली  करण्यात आली.

या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, न.मुं.म.पा पोलीस बंदोबस्त तसेच, 08 मजूर, 1 पिकअप व्हॅन, 02 इलेक्ट्रॉनिक हॅमर, 01 गॅस कटर इत्यादी चा वापर करण्यात आला. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *