मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत डीआरपीपएलकडून गेल्या पंधरा दिवसांपासून घरोघर सर्वेक्षण सुरू आहे. मात्र सर्वेक्षणाचा वेग मंद असल्याने आतापर्यंत केवळ ६०० झोपड्यांचे सर्वेक्षण झाले आहे.

त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून सर्वेक्षणाचा वेग वाढवण्यासाठी पंधरा टीम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १५ सर्व्हेयर आणि ७ नायब तहसीलदार नव्याने घेतले जाणार आहेत.

धारावीत एक लाखाहून अधिक झोपड्या असून त्यांचे नंबरिंग आणि सखोल माहिती पुढील सहा-आठ महिन्यात जमा करण्याचे उद्दिष्ट धारावी पुनर्विकास प्राधिकरण लिमिटेडने ठेवले आहे. त्यानुसार १८ मार्चपासून नंबरिंगचे काम माटुंगा येथील कमला रमण येथून सुरू झाली आहे. तसेच १ एप्रिल पासून घरोघर सर्व्हे सुरू झाले.

सुरुवातीला पाच टीम होत्या, मात्र एका घराचा सर्व्हे पूर्ण करण्यासाठी पाऊण तासाहून अधिक वेळ लागत आहे, तसेच सर्व्हे मशीनला रेंज नसल्याने ओटीपी मिळत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने सर्व्हेच्या टीम वाढवल्या आहेत. तरीही सर्व्हेला विलंब लागत असल्याने डीआरपीपीएलने आणखी पंधरा टीम वाढवल्या जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून पंधरा सर्व्हेयर आणि सात नायब तहसिलदार देण्याबाबत मागणी केली असून लवकरच ते मिळतील अशी माहिती डीआरपीपीएलच्या अधिकाऱ्यांने दिली.

एका सर्व्हेयरकडे दोन टीमची जबाबदारी धरणार

धारावीत घरोघर सर्व्हेचा वेग वाढवण्याच्या हलचली सुरू आहेत. त्यासाठी सर्व्हरच्या टीममध्ये भविष्यात वाढ करावी लागल्यास एका सर्व्हेयरकडे दोन टीमची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व्हेच्या कामाला वेग मिळू शकणार आहे.

पावसाळ्यात सर्व्हे मंदावणार

धारावीचा बहुतांश सखल भाग आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी भरते, झोपड्यांमध्ये पाणी जात असल्याने पावसाळ्यात सर्व्हेचा वेग मंदावणार आहे. त्यामुळे १५ जून पर्यंत जास्तीतजास्त झोपड्यांचा सर्व्हे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *