मुंबई : तुटपूंजा निधी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या यामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ढासळत आहे. हे कमी ठरावे म्हणून राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेली ग्रामीण रुग्णालयातील केवळ ४० टक्केच खाटांचा रुग्णोपचरासाठी वापर होत असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. याशिवाय बहुतेक प्राथमिक आरोग्य केंद्रांचीही अवस्था दयनीय असल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राज्यात आरोग्य विभागाअंतर्गत ३६४ ग्रामीण रुग्णालये असून पुरेसे डॉक्टर नसल्याने, तसेच विशेषज्ञ डॉक्टरांअभावी येथील केवळ ४० टक्के खाटांचा रुग्णोपचारासाठी वापर होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या एकूणच कामकाजाचा आढावा घेणारा अहवाल ‘आशियाई विकास बँके’ने तयार केला होता. यात ग्रामीण रुग्णालयांचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. तसेच १९०८ प्राथमिक केंद्रांपैकी अनेक केंद्रामध्ये डॉक्टर उपलब्ध नसणे, केंद्र सरकराच्या आरोग्य विभागाच्या मानकांची पूर्तता न होणे आदी मुद्दे मांडण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *