अनिल ठाणेकर

ठाणे : आरटीई २५% मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत पात्र असणाऱ्या (वंचित गट : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,एसटी, व्हिजे, ओबीसी, एसबीसी, दुर्बल गट- १ लाखापेक्षा कमी उत्पन्न, दिव्यांग  बालकांचे ४०% अपंगत्व असल्यास) जास्तीत जास्त पालकांनी

आपल्या बालकांची अर्ज नोंदणी करून सदर सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण विभाग (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सर्व पंचायत समिती व महानगर पालिकामध्ये एकूण २ हजार ६१६ पात्र शाळा असून एकूण ३६ हजार ८२८ रिक्त जागा उपलब्ध आहेत. आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून दिलेल्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new  या वेबसाईटवर दि. १६/०४/२०२४ ते ३०/०४/२०२४ रोजी पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centers), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, असेही शिक्षण विभाग (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *