अभिषेकची आयआरपीएसवरून आयएस पदावर झेप

उल्हासनगर : आंबेडकरी चळवळीतील नेते माजी नगरसेवक प्रमोद टाले यांचा मुलगा अभिषेक टाले यांनी दुसऱ्यांदा दिलेल्या यूपीएससी परीक्षेत आयआरपीएस वरून आयएएस पदावर झेप घेतली आहे.या यशाबद्दल अभिषेक वर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.

उल्हासनगरातील सुभाष टेकडी,कानसई रोड परिसरात राहणारा अभिषेक टाले यांनी 2016 साली यूपीएससी परीक्षेत 800 वा क्रमांक पटकावला होता.केंद्र सरकारने त्याची आयआरपीएस अर्थातच इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस या पदावर नियुक्ती केली होती.अभिषेकने या पदावर 4 वर्षे लखनऊ डिव्हिजन इंचार्ज व गेल्या वर्षभरापासून पंजाब फिरोजपुर डिव्हिजन इंचार्ज म्हणून काम पाहिले आहे.

मात्र अभिषेक याची जिद्द इंडियन ऍडमिस्टेटीव्ह सर्व्हिस अर्थात आयएएस सेवेत यायची असल्याने त्याने पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली.या परिक्षेचा निकाल लागला असून अभिषेक याने त्यात 249 वा नंबर मिळवून त्याचे आयएएस चे स्वप्न पूर्ण केले आहे. प्रमोद टाले यांची मुलगी अक्षता टाले ही नाट्यक्षेत्रात अभिनेत्री आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *