‘टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड’ने ‘शेल इंडिया मार्केट्स प्रा. लि.’ या कंपनीबरोबर भागीदारी करार केला आहे. त्यामागे देशभरात चार्जिंग स्टेशन्स उभी करण्याचा विचार आहे. या योजनेसाठी टाटा समूहाची कंपनी ‘टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड’ने अलीकडेच ‘शेल इंडिया मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेड’सोबत सामंजस्य करार केला आहे.इलेक्ट्रिक वाहनांसाठी चाजि ंर्गसुविधांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी दोन्ही कंपन्या सुविधा निर्माण करतील. सध्या रेंज आणि चार्जिंगच्या समस्यांमुळे लोक इलेक्ट्रिक वाहने वेगाने स्वीकारत नाहीत. ईव्ही वाहनांच्या कमी विक्रीमागील महत्त्वाचे कारण म्हणजे चार्जिंग स्टेशन्सची कमतरता. या भागीदारीअंतर्गत, टाटा पॅसेंजर आणि शेल इंडिया या दोन्ही कंपन्या लोकांना इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करतील. दोन्ही कंपन्यांनी सोयीनुसार पेमेंट सिस्टीम आणि लॉयल्टी प्रोग्राम सुरू करण्याची योजना आखली आहे.
दोन्ही कंपन्यांमधील या भागीदारीद्वारे, ‘शेल’चे देशव्यापी इंधन स्टेशन नेटवर्क आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क टाटाच्या १.४ लाख इलेक्ट्रिक वाहनांचा तपशील वापरून भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. टाटा कंपनीचे म्हणणे आहे की टाटा इलेक्ट्रिक वाहनांचा वावर ज्या रस्त्यावर अधिक आहे, त्या रस्त्यावर चार्जिंग स्टेशन्स बांधली जातील. इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांच्या बाबतीत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचा बाजारहिस्सा ७१ टक्के आहे. कंपनीने गुरुग्राममध्ये आपले पहिले ईव्ही विशेष स्टोअर सुरू केले आहे. कंपनीने देशातील चार्जिंग पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी अनेक चार्ज पॉइंट ऑपरेटर्ससोबत काम केले आहे.
‘शेल इंडिया’ ही जागतिक ऊर्जाक्षेत्रातील कंपनी ‘शेल’ची उपकंपनी आहे. ‘एनर्जी सोल्युशन्स’ आणि इन्फ्रा डेव्हलपमेंटमध्ये या कंपनीचे कौशल्य आहे. शेलची ईव्ही रिचार्ज स्थाने अल्ट्रा-फास्ट चार्जिंग देतात. टाटा समूह आणि शेल इंडिया या दोन्ही कंपन्यांच्या एकत्र येण्यामुळे आर्थिक वाढीला मदत होईल आणि ईव्ही क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमुळे बांधकाम, देखभाल आणि ऑपरेशन्समध्ये रोजगाराच्या संधीदेखील निर्माण होतील. यामुळे संबंधित उद्योगांमध्ये नवकल्पना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन मिळेल. ही भागीदारी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देईल. वाहनांचे उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टालाही मदत करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *