उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका व द युनिक अकॅडमी कल्याण यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा परीक्षा UPSC व MPSC मोफत मार्गदर्शन व MPSC तुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व अनुभव कथन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त  अजीज शेख सर व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले नुकत्याच झालेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

या वेळी MPSC तुन निवड झालेले  सागर मुळीक (उपजिल्हाधिकारी), मयूर रसाळ (पोलिस उप अधीक्षक) व राधिका रसाळ (उप शिक्षण अधिकारी ) यांनी आपले अनुभव कथन केले तर MPSC तुन निवड झालेली दिक्षा पाटील (सहायक गट विकास अधिकारी ),आदेश तरे (पोलिस उप निरीक्षक ) सागर मोरे (पोलिस उप निरीक्षक ) युनिक अकॅडमी चे प्रा.आकाश मनोरे सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

उल्हासनगर  महानगरपलिकाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी या कार्यक्रमाचा उद्देश काय होता व अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांना काय फायदा होत आहे याचे स्पष्टिकरण केले. मालमत्ता विभाग प्रमुख अलका पवार यांनी आभार मानले तर कार्यक्रमाला दिलेल्या संधीबद्दल  सचिन रोकडे, युनिक अकॅडमी कल्याण यांनी आभार मानले .

कार्यक्रमात अभ्यासिकेच्या प्रमुख वत्तुरकर मॅडम व छाया डांगळे, अंकुश कदम व कर्मचारी वर्ग उपस्थित होता या वेळी मुलांची संख्या लक्षणीय होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *