अशोक गायकवाड

पालघर : उष्माघात आणि त्याच्यापासून स्वत:चा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत माहितीपत्रकाची प्रसिध्दी करण्यात आली. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य यंत्रणांना सज्ज ठेवण्याबाबत सुचित करण्यात आले. उष्माघातात काय काळजी घ्यावी याबाबतचे माहिती पत्रक सोबत जोडण्यात आलेले आहे.उष्णता वाढली आहे, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे मान्सूनपुर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी बोडके बोलत होते. बैठकीची सुरुवात सध्या चालु असलेला ज्वलंत विषय उष्माघात आणि त्याच्यापासून स्वत:चा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव कारणे तद्नंतर मान्सून कालावधीत जिल्ह्यात पुर परिस्थिती निर्माण होऊन जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना २० मे पर्यंत काम पुर्ण करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिल्या. नालेसफाई करणे, रस्त्यावर साईनबोर्डवर आलेल्या आणि विजेच्या तारावर आलेल्या झाडांच्या फांद्या कापणे, वाकलेले विजेचे खांब सरळ करणे, विजेच्या तारा आढून ताईट करणे, राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूचे पाण्याचे नैसर्गिक प्रवाह पुर्ववत करणे, अनाधिकृत पोचमार्ग हटविणे, धोक्याच्या ठिकाणी सुरक्षा बाबतचे बॅनर लावणे इत्यादी कामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिले. सदर बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी भनुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, अतिरिक्त आयुक्त वसई विरार शहर महानगर पालिका संजय हेरवाडे, प्रकल्प संचालक भाराराप्रा ठाणे सुहास चिटणीस, कमांडंट भारतीय तटरक्षक दल जिथू जोस, , जिल्हा शल्य चिकित्सक रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष चौधरी, कार्यकारी अभियंता पाटबंधारे योगेश पाटील ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *