अशोक गायकवाड
रायगड : निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) संजीव कुमार झा मतदार संघात दाखल झाले असून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी त्यांचे स्वागत केले.भारत निवडणूक आयोगाने ३२ रायगड लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून संजीव कुमार झा यांची नियुक्ती केली आहे. संजीव कुमार झा जिल्ह्यात दाखल असून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी त्यांचे स्वागत केले.
