लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
राजीव चंदने
मुरबाड : मुरबाड तालुक्यात अनेक वाडया पाड्यामधे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहॆ, त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वन वन करावी लागत असून त्यामुळे महिलांमधे संतापाची लाट पसरली आहॆ, शहरापासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर असलेल्या फणसोली गावात पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाल्या मुळे अखेर येथील महिलांनी मुरबाड पंचायत समितीच्या कार्यालयावर प्रशासनाचा निषेध करत हंडा मोर्चा काढला यावेळी कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा तिव्र शब्दात निषेध करून प्रसंगी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा हि यावेळी देण्यात आला आहे.
गावातील विहिरी कोरड्या झाल्या आहेत.जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे.मात्र संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे . तसेच विहिरीचे काम अपुर्णावस्थेत असून अंदाजपत्रकात प्रमाणे काम केले नसून
या ठेकेदाराने तलावातून पाणी आणून कोरड्या विहिरीत सोडल्याचा प्रकार घडला आहे.परंतु हे पाणी येथील लोकसंख्येला पुरेसे नसून या गढुळ पाण्याला घाण वास येत असून .हे पाणी आंघोळीसाठी सुध्दा कोणी वापरू शकत नाही असा आरोप महिलांनी आपल्या निवेदनात केला आहे.यावेळी महिलांनी सांगितले की लवकरात लवकर आम्हाला टॅंकरने पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला नाही तर आम्ही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार सुध्दा टाकू असा इशारा दिला आहे.
फणसोली गावासाठी रोज दोन टॅंकर पाणी पुरवठा करण्यात येईल व भुजल सर्वेक्षण व ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे फेर सर्वेक्षण करण्यात येऊन निर्णय घेतला जाईल.”–उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, उपविभाग मुरबाड.
