मोंढा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आमचं खानदानी भांडण आहे. जोपर्यंत संघ किंवा आम्ही आमची भूमिका बदलणार नाही तोपर्यंत मैत्री नाही अशा शब्दात वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली.
आमचे तर संघासोबत भांडण सुरुच राहील, परंतु आता मोदी संघाचेही ऐकावयास तयार नाहीत. निवडणुक रोखे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी तंबी दिल्यानंतर बँकेने सर्व कागदपत्रे पुढे आणली. त्यात भाजप आणि कॉग्रेसलाही पैसा मिळाला आहे. ज्या ड्रग कंपन्याच्या औषधांमुळे लोकांचे मृत्यू होत आहेत. त्या कंपन्यांना बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या कंपन्यांनी ३०० ते ४०० कोटी रुपयांचे रोखे घेवून ते भाजपाला दिले. त्यानंतर या कंपन्याचे ड्रग पुन्हा बाजारात आले. लोक मेले तरी चालतील पण पक्षाच्या तिजोरीत पैसे आले पाहिजेत अशी भाजपाची भूमिका आहे, असा टोलाही आंबेडकर यांनी लगाविला.
