रायगड : रायगडमध्ये भाजपप्रणीत महायुतीचे राष्ट्रावीदीचे उमेदवार सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्यात काटें की टक्कर आहे. दोन्ही उमेदवार तापत्या उन्हात प्रचाराचा धडाका लावत आहेत. पण विरोधकांपेक्षाही या दोघांना टेन्शन आहे ते या मतदार संघातील डुप्लिकेट उमेदवारांचे.

या मतदार संघात तीन अनंत गीते आणि दोन सुनील तटकरे निवडणूक लढवित आहेत. गीते आणि तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तींनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे येथे या दोन्ही प्रमुख उमेदवारांपुढे मतफुटीचा धोका निर्माण झाला आहे.

२०१४ च्या निवडणूकीत डुप्लिकेट सुनील तटकरेंमुळे सुनील तटकरेंचा पराभव झाला होता. त्या निवडणूकीती विजयी उमेदवार अनंत गीते यांना एकुण ३,९६,१७८ मते पडली होती तर सुनील तटकरेंना ३,९४,०६८ मते पडली होती. अवघ्या २११० मतांनी त्यांचा पराभव झाला होता. आणि या निवडणूकीत डुप्लिकेट तटकरेंना ९८४९ मते पडली होती. २०१९ च्या निवडणूकीत सुनील तटकरेंनी ही काळजी घेत या अपक्ष डुप्लिकेटांचा बंदोबस्त केला होता. आणि ते निवडणूक जिंकले होते. यंदा तटकरेंचा डुप्लिकेट तर आहेच पण अनंत गीतेंच्या नावाशी साम्य असणारे दोन उमेदवार रिंगणात आहेत.

रायगडमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेटवची तारीख ही २२ एप्रिल आहे. तोवर अनेक अर्थपुर्ण चर्चा होऊन कोण कीती डुप्लिकेटांना माघार घ्यायाल लावतो यावर रायगडमध्ये जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *