राष्ट्रवादीच्या जाहिरनामा समितीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील जाहिरानामाच्या अंतिम मसुद्यावर शेवटचा हात फिरवताना. सोबत पक्षाचे माध्यम सल्लागार व समितीचे सदस्य संजय मिस्कीन.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहिरनामा आज (सोमवारी) प्रकाशित होणार असून जाहिरनामा समितीचे अध्यक्ष आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी जाहिरनाम्यावर अंतिम हात फिरवत मान्यता दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सोमवारी जाहिरनामा प्रसिद्ध करणार आहे. त्यासाठी रविवारी पक्षाचा हा जाहिरनामा अंतिम करण्यात आला. जाहिरनामा समितीचे अध्यक्ष आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पक्षाचे माध्यम सल्लागार व समितीचे सदस्य संजय मिस्कीन यांनी भेट घेऊन अंतिम संमती घेतली.
उद्या सकाळी ११ वाजता पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा जाहिरनामा मुंबईत प्रसिद्ध केला जाणार आहे.
