पॅरिसमधिल जागतिक छायाचित्र स्पर्धेत पहिला क्रमांक
मुंबई- औरंगाबादच्या बैजू पाटील यांनी पुन्हा एकदा जागतिक पातळीवर आपला ठसा उमठविला आहे. पॅरिसमधिल ३३ व्या जागतिक पक्षी आणि निर्सग छायाचित्र स्पर्धेत बैजू पाटील याच्या फायर विंगस या छायाचित्राला पहिला क्रमांक मिळाला.
बैजू पाटील हे गेली 37 वर्षांपासून छायाचित्र क्षेत्रामध्ये काम करत आहेत. नुकतेच पॅरिसमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेमध्ये जगभरातून 27 देशांनी भाग घेतला होता या स्पर्धेसाठी 16500 छायाचित्र आलेली होती अशा अटीतटीच्या स्पर्धेमध्ये बैजू पाटील यांनी बाजी मारली.
हा फोटो धारूर येथे बीड महाराष्ट्र जवळ काढलेला आहे भारतामध्ये हा फोटो कोतवाल द्रोंगो नावाच्या पक्षी आहे आणि जेव्हा शेतामध्ये ऊस कापल्यानंतर जी पाचट पडलेली असते ते पंधरा ते वीस दिवस एक महिना ती तशीच शेतामध्ये पडलेली असते आणि त्या पाचवडच्या खाली अनेक जीवजंतू तयार होतात आणि त्याच्यानंतर शेतकरी त्या त्या पाचडला गवताला जातात आणि जळाल्यानंतर त्या जाळीमधून कीटक आपला जीव वाचवण्यासाठी हवेत उडायला लागतात ते जसे उडायला लागले की तसे कोतवाल नावाच्या या पक्षाला ती माहिती आहे आणि ते लगेच तिथे बऱ्याच प्रमाणात येतात आणि ते कीटक खाण्यासाठी एकमेकांमध्ये चढाओढ लागते बऱ्याच वेळेस हे पक्षी त्या आगीमधून पटकन जाऊन कीटक पकडण्याचा प्रयत्न करतात व यशस्वी पण होतात अशा दुर्मिळ क्षण बैजू पाटील यांनी टिपून एक अविस्मरणीय फोटो काढला. ज्याला पॅरीसमध्ये सन्मानित करण्यात आले. हा फोटो काढताना बैजू पाटील हे स्वतः आगीच्या मध्ये जाऊन धोका पत्करून जीवाची परवा न करता त्यांनी हे छायाचित्र काढले आहे
बैजू पाटील यांच्याकडे आत्तापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 169 पुरस्कार मिळालेले आहेत व सतत ते नवीन काहीतरी इतिहास रचनेच्या प्रयत्न करत असतात व त्यांनी अनेक छायाचित्रकार घडवलेले आहेत व ते नेहमी सतत नवीन पिढीला प्रोत्साहन देत राहतात ह्या पुरस्कारामुळे भारताचे नाव प्रथम स्थानी पोहोचले आहे व बैजू पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे
