महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या

ठाणे : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे जिल्हा समन्वय समिती यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांची  बुधवारी, 24 एप्रिल दुपारी 3.00 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात ही बैठक होणार असून जिल्ह्यातील सर्व वर्ग एक व वर्ग दोनच्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

राजपत्रित अधिकारी महासंघ ही संघटना अधिक सबळ आणि कार्यशील करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे  आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी संस्थापक अध्यक्ष व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, कोषाध्यक्ष नितीन काळे या मान्यवरांसह राज्य कार्यकारीणीचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.‌ या बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागाच्या राजपत्रित वर्ग- अ आणि ब अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, कार्याध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, उपाध्यक्ष मोहन पवार व सरचिटणीस तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *