मुंबई : मुंबईसह जगभरातील बहाई धर्मीय समुदाय आणि त्यांचे अनुयायी एप्रिल महिन्याच्या शेवटी आणि मे महिन्याच्या सुरूवातीला येणारे दिवस मिळून 12 दिवस त्यांचा रिझवान महोत्सव उत्सव साजरा करतील अशी माहिती मरीन लाईन्स येथील बहाई सेंटर मध्ये उपस्थित बहाई समुदाय समोर नर्गिस गौर यांनी दिली.यावेळी बहाई धर्मीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नर्गिस गौर पुढे म्हणाल्या कि जगाला सुख, शान्ति, प्रेम, आनंद,समृद्धी सोबतच मानवता धर्माची शिकवण देणाऱ्या बहाई धार्मियांचा रिझवान हा वार्षिक मोहोत्सव असतो.याच वार्षिक महोत्सवा दरम्यान
बहाई धर्माचे अवतार संस्थापक, बहाउल्लाह ह्यांनी स्वतःला या युगाचे प्रेषित म्हणून घोषित केले. ही घोषणा बहाउल्लाह ह्यांनी २१ एप्रिल १८६३ रोजी बगदादमधील टायग्रिस नदीकाठी एका बागेत केली ज्या बागेला त्यांनी “रिझवान”, म्हणजे “स्वर्ग” असे नाव दिले.
या काळात बहाउल्लाहांनी त्याच्या शिकवणींच्या केंद्रस्थानी असलेल्या मूलभूत आध्यात्मिक तत्त्वांची घोषणा केली. मानवतेच्या जीवनाच्या उत्क्रांतीच्या एका नवीन टप्यावर येण्याचे संकेत शांतता आणि हिंसेचा अंत.
सोबतच याच रिझवान उत्सवाच्या पहिल्या दिवशी जगभरातील हजारो भागात बहाई अनुयायी त्यांच्या स्थानिक प्रशासकीय परिषदांसाठी मतदान करतात.
या बहाई निवडणुका अद्वितीय आहेत कारण या गुप्त मतदानाने व मतांच्या संख्या धिक्याच्याबळावर आणि उमेदवारी, नामांकन व प्रचार यांच्याशिवाय पार पडतात. मतदान करतांना बहाई भाविक निर्विवाद निष्ठा,निःस्वार्थ भक्ती, प्रशिक्षित मन, मान्यताप्राप्त कुवत आणि संपन्न अनुभव अशा प्रकारे मुल्यांकन करून तसेच
वयोमान, विविधता, लिंग किंवा अशा अन्य बाबींचा यथोचित विचार करून व्यक्तींची निवड करतात. बहाई धर्म स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाही पद्धतीने निवडलेल्या नऊ सदस्यीय परिषदांद्वारे आपले कामकाज चालवते. ही बहाईं भाविकांसाठी एक पवित्रतम प्रक्रिया असते, ज्यावेळी ते संपूर्णतः ईश्वराकडे उन्मुख होतात आणि उद्देशाच्या पावित्र्यासह, चेतनेच्या स्वातंत्र्यासह आणि हृदयाच्या शुद्ध‌तेसह बहाई निवडणुकींमध्ये सहभागी होतात.असे नर्गिस गौर यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *