८  जणांनी घेतली उमेदवारी मागे

तीन अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात.

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड लोकसभा मतदार संघात १३  उमेदवार निवडणुकीच्या  रिंगणात उरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी  रायगड लोकसभा मतदार संघातील ८  उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. ७  मे रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी सोमवारी दिली. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे , अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यावेळी उपस्थित होते.

अनंत गिते, (अपक्ष),अनंत बाळोजी गिते, (अपक्ष),  अनंत गंगाराम गिते, (शिवसेना , उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे तीन अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  रायगड लोकसभा मतदारसंघासाठी २८  उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छानणीत  ७ जणांचे अर्ज बाद झाले. सोमवारी  दुपारी ३  वाजेपर्यंत ८  उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे १३  निवडणूकीच्या रिंगणात उरले आहेत.

१३ उमेदवार असल्यामुळे एक युनिटवर  मतदान घेता येणार आहे.  प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली.

निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार

१) अनंत गिते, (अपक्ष),

२) अनंत बाळोजी गिते, (अपक्ष),

३) अनंत गंगाराम गिते, (शिवसेना , उद्धव बाळासाहेब ठाकरे),

४)  नितीन जगन्नाथ मयेकर, (अपक्ष),

५) मंगेश पद्माकर कोळी, (अपक्ष),

६) प्रकाश बाळकृष्ण चव्हाण, (भारतीय जवान किसान पार्टी)

७)  पांडुरंग दामोदर चौले, (अपक्ष)

८) सुनिल दत्तात्रेय तटकरे, (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)

९ ) निवास सत्यनारायण मट्टपरती, (अपक्ष)

१० ) अजय यशवंत उपाध्ये, (अपक्ष)

११ ) अंजली अश्विन केळकर,(अपक्ष)

१२)  अमित श्रीपाल कवाडे,(अपक्ष)

१३ ) श्रीमती कुमोदिनी रविंद्र चव्हाण, (वंचित बहुजन आघाडी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *