मोदी-शाहांना चॅलेंज, ठाकरेंना संपवून दाखवाच !
परभणी- कोसळणाऱ्या धुवाँधार पावसात उध्दव ठाकरेयांनी किल्ला लढवित परभणीकरांना भावनिक साद घातली. वादळ पावासाला अंगावर घ्यायला सुध्दा मर्दाची छाती लागते ती माझ्या शिवसैनिकांकडे आहे. . आम्ही पाठीवर वार करत नाहीत. आम्ही वादळाच्याही छातीवर वार करणारे शिवरायांचे मावळे आहोत”, असं ठणकावत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी खुले चँलेंज दिले. या उध्दव ठाकरेंना तुम्हाला संपवायेच आहे ना तुम्हाला मी चँलेंज देतो, या ठाकरेला संपवून दाखवाच…ठाकरेंच्या या आवेशपुर्ण भाषणाला सभेतील शिवसैनिकांनी भर पावसात टाळ्यांच्या गजरात साथ दिली.
“परभणी माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तुम्ही सर्व त्याचे सैनिक आहात. भाजपला आणि मिंध्यांना असं वाटलं असेल की, सर्व काही पैशांनी विकत घेता येतं. पण परभणीकर पैशांनी विकले जाऊ शकत नाहीत. हे संजय जाधव याने दाखवून दिले. हे शिवसेना प्रमुखांनी कमवलेलं जे प्रेम आहे ते आशीर्वादाच्या रुपाने माझ्या समोर बसलं आहे. ही आपली परीक्षा आहे. आणि त्यात आपण संजयला निवडून पास होणारच असा विश्वास उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरु झाल्यानंतर काही वेळाने पावसाचा वेग कमी झाला. या दरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजप, मोदी-शाह यांच्यावर सडकून टीका केली.
“तुम्हाला कल्पना आहे, एक-दोन दिवसांपूर्वी मी पत्रकार परिषद घेतली होती. कशासाठी घेतली होती? आपलं जे मशाल चिन्ह आहे त्यामध्ये एक शब्द आहे, जय भवानी, जय शिवाजी, आता त्या गीतातील मोदी-शाहांचा जो नोकर निवडणूक आयोग आहे त्याने सांगितलं की, जय भवानी शब्द काढा. काढायचा शब्द? मी तर मोदी आणि शाह यांना सांगतो, तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र हा जय भवानी, जय शिवाजी बोलत उठाबशा काढायला सांगितल्याशिवाय राहणार नाही”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.