रमेश औताडे
मुंबई : उत्तर मुंबई मतदारसंघाचे भाजपा उमेदवार पियुष गोयल यांनी आगरी, कोळी समाजाचा अपमान केल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिनांक २१ एप्रिल रोजी मुंबई शहर व उपनगरात गोयल यांच्याविरोधात आंदोलन केले.
यावेळी कांदीवली येथे भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला केला, महिलांना धक्काबुक्की केला वाहनांची तोडफोड केली.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी माजी मंत्री अस्लम शेख यांच्यासह कांदिवली पोलीस स्टेशनला भेट देऊन भाजपाच्या गुंडांवर कारवाई करावी अशी मागणी केली. काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचे CCTV मध्ये स्पष्ट दिसत आहे.
“काँग्रेस हा शांततेच्या मार्गाने चालणारा पक्ष आहे याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत असे समजू नये. हल्ले करणे ही काँग्रेसची संस्कृती नाही परंतु भाजपाच्या गुंडांवर कारवाई केली नाही तर आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल”, असा इशारा वर्षाताई गायकवाड यांनी दिला आहे.
यावेळी उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष कालू बुधेलिया, मा.नगरसेविका अजंता यादव, शितल म्हात्रे, काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, राजपती यादव, मुंबई उपाध्यक्ष अशोक सुत्राळे, भूषण पाटील, प्रगती राणे, नीता महाडिक, कुमार खिल्लारे, किशोर सिंग व इतर नेते, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
