अनिल ठाणेकर
ठाणे : देशातील राजकीय पक्षांना तसेच मतदारांना संविधानाच्या राजनैतिक चेतनेशी जोडून ‘भारताला’ अबाधित ठेवण्याचे आंदोलन आहे, मंजुल भारद्वाज रचित ‘राजगती’ हे नाटक, रविवारी ५ मेला सकाळी ११ वाजता शिवाजी नाट्यमंदिर, दादर येथे प्रस्तुत होणार आहे.
लोकशाही आणि संविधान कायम ठेवायचे असेल तर जनतेचा विवेक जागृत करणे आवश्यक आहे. लोकशाहीचे पर्व म्हणजेच निवडणुका जाहीर झाल्या आहेत. विकारी प्रवृत्तींनी संविधान उद्ध्वस्त करण्याची घोषणा केली आहे. आम्ही संविधान बदलू असे उघडपणे जाहीर केले आहे. अशा विनाशाच्या काळात ही निवडणूक केवळ सरकार निवडण्यासाठी नाही तर संविधानाची मूल्य जपणारे लोकशाहीचे शिलेदार निवडण्यासाठी आहे. लक्षात ठेवा २६ जानेवारी १९५० रोजी भारतात प्रथमच सर्वांना समानतेचा अधिकार मिळाला. समतेने वर्णव्यवस्थेतून मुक्तीचा बिगुल फुंकला आणि देशातील प्रत्येक व्यक्तीला व महिलांना समानतेचा अधिकार मिळाला. विचार करा, आपल्याकडून या समानता आणि मतदानाचा हक्क काढून घेतला तर आपल्याला कसे वाटेल? मणिपूरप्रमाणे भारतभर महिलांवर लैंगिक अत्याचार होत असतील तर आपल्याला काय वाटेल ?
अस्मिता आणि प्रतिष्ठा या शब्दांनी भ्रमाचे जाळे पसरवले जात आहे. पण त्याऐवजी ‘सत्य, अहिंसा आणि संविधान’ हा भारताचा वैचारिक आणि तर्कशुद्ध कणा म्हणजे भारतीयता आहे. हे भारताच्या लोकांनो, जागे होऊया आणि संविधान जपुया. राजकारण म्हणजे केवळ सत्ता मिळवणे, निवडणुका घेणे किंवा संसदेत वाद-विवाद करणे नव्हे, तर मानवतेच्या सर्वांगीण कल्याणासाठी जनतेची आणि राज्यकर्त्यांची चेतना जागृत करण्याची प्रक्रिया आहे. ‘थिएटर ऑफ रेलेव्हन्स शुभचिंतक आणि अभ्यासक’ रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित – दिग्दर्शित नाटक ‘राजगती’ रविवारी ५ मे रोजी सकाळी ११ वाजता श्री शिवाजी नाट्यमंदिर दादर येथे प्रस्तुत करणार आहेत.
राजकारण म्हणजे घाणेरडे, राजकारण हे केवळ राजकीय पक्षांपुर्ते मर्यादित आहे, याचा भ्रम मोडीत काढून देशाच्या जनतेला नागरिक करण्याची प्रक्रिया आहे हे नाटक. देशातील राजकीय पक्षांना तसेच मतदारांना संविधानानुसार राजनैतिक चेतनेशी जोडून ‘भारताला’ अबाधित ठेवण्याचे आंदोलन आहे, ‘राजगती’ हे नाटक ! संविधानाने आपल्याला मालक होण्याचा हक्क दिला आहे आणि तो हक्क म्हणजे मताधिकार. आपण आपला मताधिकार निभवत नाही आणि मग दरवेळी राजनीतीला नावं ठेवतो.आपली मनोभूमिका ठरवून टाकतो की, राजनीती ‘वाईट’ आहे,चिखल आहे. राजनीतिशी आमचं काहीही घेणं देणं नाही. आपले आयुष्य दर क्षणी ‘राजनीती’ ने प्रभावित आणि संचालित होत असते पण एक ‘सभ्य’ नागरिक होऊन आपण केवळ आपल्या ‘मताचे दान’ करतो किंवा आपले मत मोफत धान्य,पैसा, दारू किंवा साडीसाठी विकतो. जेव्हा तुम्ही तुमचे मत विकता, तेव्हा लक्षात घ्या तुम्ही तुमचा देश ही विकता. ही आपल्या राजनैतिक भूमिकेपासूनची पळवाट आहे. एक क्षण विचार करूया, की खरंच राजनीती वाईट आहे की आपण त्यात सहभागी न होऊन त्याला वाईट बनवत आहोत ? आणि जेव्हा देशाचे नागरिक त्याला नाही चालवणार तर मग वाईट प्रवृत्तीचे लोक सत्ता चालवणार आणि आज तेच घडतं आहे. नाटक राजगति जनतेला आपल्या राजनैतिक मुक्तिसाठी चार सूत्र देते सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीति. सत्ता नेहमीच भ्रष्ट राहणार, मग ती कोणतीही असो किंवा कोणाचीही असो, व्यवस्था आपल्या जडत्वातून कोणत्याही परिवर्तनाला प्रभावहीन बनवते, राजनैतिक चरित्र घडवल्याशिवाय संपूर्ण राजनैतिक प्रक्रिया पाखंडाची शिकार होते. म्हणूनच सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीति या चारही आयामांना एकत्र समजणे अनिवार्य आहे. नाटक राजगति ‘राजनीति’ ला पवित्र नीती मानते. जनतेकडून राजनीति मध्ये विवेकपूर्ण सहभागितेची अपेक्षा करते. राजनीति सत्ता, व्यवस्था आणि राजनैतिक चरित्राला स्वच्छ करणारी पवित्र नीती आहे. प्रत्येक भारतवासीयांत राजनीतिची विवेकी मशाल पेटवून आपल्या स्वतंत्रता सेनानींनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. पण काही सत्तालोलुपांनी, सत्तेच्या दलालांनी‘राजनीति घाण आहे या कलंकाला सुनियोजित षडयंत्राने १४२ करोड देशवासियांच्या मेंदूत रुजवले. ज्याच्या मूळे जनता राजनैतिक प्रक्रियेत सहभागी नाही होत. कोणी सहभागी होत आहे तर ते फक्त सत्तालोलुप जे भांडवलदारांच्या बळावर वोट विकत घेऊन प्रत्येक निवडणुकीत लोकशाहीचे हनन करत आहेत. नाटक ‘राजगती’! हुकूमशाही सत्ता आणि राजकीय परिदृश्याला बदलण्याचे राजकीय सूत्र आहे.
