अशोक गायकवाड
रायगड : ३२ रायगड लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक सर्वसाधारण निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने संजीवकुमार झा यांची नियुक्त्ती केली असून त्यांनी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. तसेच संबंधितांना येथील उपाययोजनांबाबत सूचना दिल्या.
निवडणूक निरीक्षक झा यांनी महाड विधानसभा मतदार संघास भेट देऊन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार महेश शितोळे, नायब तहसीलदार खोपकर उपस्थित होते. यावेळी झा यांनी महाड मतदार संघातील स्ट्रॉंग रूम ची पाहणी केली. तसेच मतदान यंत्र वितरण आणि संकलन केंद्राची पाहणी केली. मतदान यंत्र तयार करणे बाबत आवश्यक ती सर्व नियमानुसार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिली.
