ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांचे निर्देश

अनिल ठाणेकर

ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रत्येक बूथनिहाय, मतदान केंद्रावर वीज, पाणी, रॅम्प, फर्निचर, शौचालय, व्हीलचेअर या सर्व अत्यावश्यक बाबी उपलब्ध असल्याची खात्री करा असे निर्देश ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिले.

पंचायत समिती मुरबाड येथे जिल्हा परिषद, ठाणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आज पार पडली. यावेळी गट विकास अधिकारी श्वेता पालवे याच्या समवेत पंचायत समितीच्या सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत विभाग निहाय आढावा घेण्यात आला. विविध कामकाज जलदगतीने करण्याच्या सुचना देण्यात आल्या. सॅममॅम बालकांची संख्या वाढ होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्यासाठी सुचना देण्यात आले. प्रत्येक ग्रांमपंचायत अंतर्गत पाणी पुरवठा किंवा पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्यासाठी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कार्यक्रमानुसार बूथनिहाय प्रत्येक मतदान केंद्रावर वीज, पाणी, रॅम्प, फर्निचर, शौचालय, व्हील चेअर या सर्व अत्यावश्यक बाबी उपलब्ध असल्याबाबत आढावा घेण्यात आला. महिला बचत गटातील महिलांना मतदानाबाबत जनजागृत करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बचत गटातील महिलांसमवेत मतदान जनजागृतीपर शपत घेतली तसेच स्वीप कार्यक्रमाबाबत आढावा घेण्यात आला. बांबू लागवड व मनरेगा संदर्भांतील सुरु असलेल्या कामाची विस्तारित माहिती घेण्यात आले. माझी  वसुंधरा अंतर्गत झालेल्या कार्यक्रमांची माहिती वेळेत भरण्याच्या सुचना दिल्या. यावेळी समाज कल्याण विभागप्रमुख संजय बागुल, जिल्हा कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, पंचायत समिती मुरबाडचे गटविकास अधिकारी श्वेता पालवे तसेच पंचायत समिती अंबरनाथ येथील सर्व विभाग प्रमुख व केंद्रप्रमुख उपस्थित होते.

अंबरनाथ विधानसभा स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी केलेल्या उपक्रमांची माहिती घेण्यात आली. तसेच मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी विविध पध्दतीचा वापर करुन, जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचून मतदान जनजागृती करणे. पंचायत समिती अंबरनाथ येथील जिल्हा परिषदेच्या ४२८ शाळेत प्रभात फेरी काढणे, रांगोळी, गायन, नृत्य, नाटक, पथनाट्यद्वारे मतदान जनजागृती करणे महिला बचत गटांद्वारे मतदानाबाबात जनजागृती करून जास्तीत जास्त महिलांचा सहभाग वाढविणे. प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती संदर्भात सर्व शाळांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन पूर्ण करणे याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच कामकाज वेळेत पुर्ण करण्याबाबत सांगण्यात आले. मुख्याध्यापक व शिक्षक यांचे नांवाचे रजिस्ट्रेशन करणे. एक शिक्षकी शाळा आहे तेथे प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकाने रजिस्ट्रेशन करणे व शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन अर्ज भरणे. ग्रामीण भागातील ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळांना लाईट/ पिण्याच्या पाण्याची सोय, खोली वर्ग व्यवस्था सुस्थितीत असल्याची माहिती घेण्यात आली. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा पोर्टलवर नोंदणी करून प्रशिक्षण घ्यावे व शेवटी शपथ घेऊन प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याबाबत सांगण्यात आले. संस्थेमार्फत कचरा उचलण्यात येणाऱ्या नेवाळी नाक्याच्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली. कचरा व्यवस्थापन व रस्त्यालगत साठलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना गटविकास अधिकारी, पंचायत समिती अंबरनाथ यांना यावेळी देण्यात आल्या. यावेळी समाज कल्याण विभागप्रमुख संजय बागुल, जिल्हा कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, पंचायत समिती अंबरनाथचे गटविकास अधिकारी नारायणसिंग परदेशी, अंबरनाथ नगरपालिका अतिरिक्त मुख्याधिकारी अभिजीत पराडकर, पंचायत समिती अंबरनाथचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार जतकर, कुळगाव- बदलापूर प्रशासन अधिकारी विलास जडये, तसेच पंचायत समिती अंबरनाथ येथील सर्व विभाग प्रमुख व केंद्रप्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *