ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात

ठाणे : ‘उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा’, ‘मतदान राजा ठेव कर्तव्याचे भान’, ‘सशक्त लोकशाहीसाठी कर मतदान’ असे आवाहन सेल्फी स्टॅण्डच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी नागरिकांना केले आहे. नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी हातभार तक्रारीचा, बोटभर उपाय असा जनजागृती करणारा सेल्फी स्टॅण्ड ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला असून कार्यालयात येणारे नागरिक या ठिकाणी सेल्फी घेत आहेत.

देशभरात सुरू असलेल्या लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांनी सक्रिय सहभाग घेवून मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे यासाठी ठाणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृतीवर विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेला सेल्फी स्टॅण्ड या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘तुमचे मत तुमचा अधिकार’, ‘वृद्ध असो किंवा जवान’, ‘सर्वजण करा मतदान, तुमचे मत खरा आधार लोकशाहीचा’ आदी घोषवाक्यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

जिल्हानिवडणूक कार्यालयाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वीपअंतर्गत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.‍ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आलेला हा सेल्फी स्टॅण्ड नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून याठिकाणी नागरिक सेल्फी देखील काढत आहे. सेल्फी स्टॅण्डवर मतदारांना ऑफलाईन माहितीसाठी मतदार मदत क्रमांक देण्यात आला आहे. नागरिकांनी या सेल्फी स्टॅण्डचा लाभ घेवून मतदान प्रक्रियेत स्वत: सहभागी व्हावे व आपल्या परिसरातील नागरिकांनाही मतदानासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *