ठाणे : सापगांव येथे वॉटर फिंडीग सेंटर मधून भरण्यात येणारे टँकर मधील पाण्याची शुध्दता त्यामध्ये असलेले टी. सी. एलचे प्रमाणाबाबत व पाण्याची प्रत्यक्ष पाहणी करताना पाणी टंचाई काळात पाण्यापासून एकही नागरीक वंचीत राहणार नाही अशा सक्त सुचना .जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी शहापूर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपचांयत सारमाळ व बोरशेती येथे भेट देऊन राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान योजनेंतर्गत सुरु असलेल्या नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाची पाहणी केली. पंचायत समिती शहापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत पंचायत) प्रमोद काळे, गट विकास अधिकारी पंचायत समिती शहापूर भास्कर रेंगडे, सहा. गट विकास अधिकारी पंचायत समिती शहापूर राजू भोसले तसेच आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक उपस्थीत होते.
ग्रामपंचायत गोठेघर येथे भेट देऊन ग्रामपंचायतीचे कामकाजाची पाहणी केली, त्यानंतर सापगांव नदीवर वॉटर फिडीग सेंटर येथे भेट देऊन कामकाजाविषयी आढावा घेतला. सापगांव येथे वॉटर फिंडीग सेंटर मधून भरण्यात येणारे टँकर मधील पाण्याची शुध्दता त्यामध्ये असलेले टी. सी. एलचे प्रमाणाबाबत व पाण्याची प्रत्यक्ष पाहणी केली. पाणी टंचाई काळात पाण्यापासून एकही नागरीक वंचीत राहणार नाही, याबाबत सक्त सुचना देण्यात आल्या. टॅंकर चालकाच्या कामाविषयी चर्चा करण्यात आली तसेच पाणी टंचाई बाबत विस्तृत आढावा घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा येथे भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. तसेच शेणवा येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी केली. ग्रामपंचायत बेडीसगांव येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान योजनेंतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाची पाहणी केली.