जळगाव : इंजिनमधे केवळ चालक बसतो. शरद पवार यांच्याकडे सुप्रिया सुळे यांना जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा आहे. यांच्या इंजिनमध्ये फक्त यांच्या परिवारासाठी जागा आहे, सामान्य माणसासाठी नाही. यांच्यासाठी यांचा परिवार दुनिया आहे पण, मोदींजीसाठी संपूर्ण देश त्यांच्या परिवार आहे आणि त्या परिवारासाठी ते काम करतात. म्हणून यांच्या इंजिनची अवस्था अशी आहे, राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे ओढतात, पवार साहेब बारामतीकडे, उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात, स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतात. यांचं इंजिन हलतही नाही, डुलतही नाही, एका जागेवर ठप्प पडून आहे, असं म्हणत फडणवीसांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी आहे. आपल्याकडे मोदींच्या इंजिनवर चालणारी पॉवर फुल गाडी आहे, सबका साथ सबका विकास धोरण ठेऊन काम केले जात आहे, असं फडणवीसांनी सांगितलं. जळगावमध्ये रक्षा खडसे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
आपल्या महायुतीच्या गाडीचं मोदीजी हे पावरफुल इंजिन आहेत. आपल्या इंजिनाला सर्वपक्षाच्या बोग्या लागल्या आहेत, ज्यामध्ये सर्व समाजाचे लोक आहेत. असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
