ठाणे : जगात चांगली माणसे  वावरत आहेत म्हणून  हे जग चालत आहे.त्याचे जवलंत उदाहरण म्हणजे ठाणे जिल्हा सामान्य रुगणालयातील कर्मचारी हेमंत सपकाळ हे आहेत.रुग्णालयात येणाऱ्या गरजूंना निष्काम भावनेतून मदत करत असतात ही त्याची ओळख आहे. हे काम इथेच न थांबवता प्रवास येता – जाता गरजूंना मदत करत असतात.

दि.24 एप्रिल 2024 रोजी श्रीम. सुलोचना गायकवाड वय 72 व 12 वर्षीय नातू सोबत अंबरनाथ वरून पुण्याला निघाले होते.दोघे अंबरनाथ वरून लोकन ने कर्जत स्टेशनला पोहोचले. पुण्याला जाण्यासाठी कोणार्क एक्सप्रेस गाडीची वाट बघत होते. ट्रेनमध्ये चढताना त्यांची चुकून कपड्याची बॅग प्लॅटफॉर्म न. 1 ला विसरली. ट्रेन लोणावळ्याला पोहचत असताना त्या आजीच्या लक्षात येते की, एक कपड्याची बॅग दिसत नाही. ती ट्रेन मध्ये इतरत्र शोधत होती. त्यावेळेस आजीच्या बाजूच्या सीट वर बसलेले हेमंत सपकाळ यांच्या लक्षात ही बाब आली असता, त्यांनी कर्जत रेल्वे पोलिस आर. पी. एफ. श्रीम. वर्षा गुंजाळ यांना भ्रमध्वनीद्वारे संपर्क केला.

सर्व घटना त्यांनी वर्षा गुंजाळ  यांना सांगितली. त्यांनी जळद गंतीने  त्याचे सहकारी होमागार्ड  कर्मचारी यांच्या मदतीने प्लॅटफॉर्म न. 1 वरून ती बॅग शोधून काढली. बॅगचा फोटो पाठवला असता फोनवरुन ती बॅग त्याच आजींचीच आहे याची शहानिशा केली. त्यानंतर त्यांनी स्वतः ती बॅग  सायं. 5 वा कर्जत वरून  नांदेड पनवेल गाडीने घेऊन आल्या तोपर्यंत त्या आजींना श्री. सपकाळ यांच्या सांगण्यावरून लोणावळा स्टेशनला वाट पाहण्यास सांगितलेले होते. काही वेळा नंतर नांदेड पनवेल गाडी साय. 5.45 वा लोणावळा स्टेशन ला आली व आर. पी. एफ. श्रीम. वर्षा मुंजाळ मॅडम नी त्या आजींना फोन करून गाडीमध्ये ती बॅग परत केली. ती बॅग मिळताच त्या आजीच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले व तीने दोघांचे पण मनापासून धन्यवाद मानले. श्री. हेमंत सकपाळ  व वर्षा गुंजाळ  यांनी केलेल्या मदतीचा सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *