माथेरान : शिक्षकी पेशा असताना सुध्दा आपल्या अंगातील एका कवीची जाणीव करून देत त्याचप्रमाणे निसर्गावर भरभरून प्रेम करणारे माथेरान नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेचे शिक्षक संघपाल वाठोरे यांनी आजवरच्या कार्यकाळात अनेक कविता लिहिल्या आहेत तर निसर्गाच्या सानिध्यात वावरताना प्रत्यक्ष निसर्गाशी हितगुज करत निसर्गाचे प्रत्येक ऋतूनुसार लेखन केले आहे. नुकताच त्यांनी ” अन देव निरुत्तर झाला” हा सुंदर काव्यसंग्रह तयार केला असून या काव्यसंग्रहाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा छोटेखानी कार्यक्रम
दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृह बोपेले, नेरळ या ठिकाणी संपन्न होत आहे. साहित्य रसिकांना कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन स्वतः संघपाल वाठोरे यांनी केले आहे.
पीपल्स पब्लिकेशन प्रकाशित आणि संघपाल वाठोरे लिखित ‘अन् देव निरुत्तर झाला…’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष – प्रा. दामोदर मोरे
ज्येष्ठ साहित्यिक, मा. मराठी विभागप्रमुख, जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे तसेच ज्येष्ठ कवी व गीतकार अरुणजी म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे यासाठी प्रसिद्ध साहित्यिक गिरीश कंटे,मल्हार संतोष पवार, संपादक, महाराष्ट्र न्यूज-24 यांची प्रमुख उपस्थितीलाभणार आहे या कार्यक्रमाचे निमंत्रक पीपल्स पब्लिकेशन्स, मुंबई. आणि पौर्णिमा मित्र मंडळ, बोपेले – नेरळ हे आहेत. सर्व काव्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संघपाल वाठोरे यांनी केले आहे.
