मंगळवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज
कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा फॉर्म देण्यात आला असून येत्या मंगळवारी 30 एप्रिलला दरेकर या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना पक्षाकडून शुक्रवारी एबी फॉर्म देण्यात आला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडून हा एबी फॉर्म देण्यात आला आहे. यावेळी मातोश्रीवर कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर परिसरातील जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. 30 एप्रिलला वैशाली दरेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आपल्या उमेदवाराची घोषणा केली, तसेच त्यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे. तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी आपल्या प्रचारास देखील सुरवात केली आहे. मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा कधी होते याची सर्वच वाट पाहत आहेत.
ठाणे, कल्याण, भिवंडी येथे देखील उमेदवारांचे अर्ज दाखल करताना महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून त्याची आखणी पक्षाकडून केली जात आहे. आता महाविकास आघाडी येत्या 30 तारखेला कशा प्रकारे शक्तिप्रदर्शन करते हे पहावे लागेल.
