कोल्हापूर : आताचे अजितदादा हे भाजपाचे दादा आहेत. आमच्या सोबत असताना लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राज्यभर प्रचार सभा घ्यायचे, पण आता कुठं बसले आहेत, तर बारामतीत सोसायटीमध्ये प्रचार करत बसले आहेत?. अशा शब्दात रोहित पवार यांनी अजित पवारांवर प्रहार केला.
पूर्वीचे दादा आणि आताचे दादा यात खूप फरक आहे असेही
रोहित पवार यावेळी म्हणाले. भाजपला जे पाहिजे होते ते त्यांनी केलं. अजितदादा पुरोगामी विचारासोबत, आमच्या बरोबर राहिले असते, तर कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते पण तसं न करता दादा सोसायटीत प्रचार करतात. पवार साहेबांच्या कार्यावरच अजितदादा प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे अजितदादा यांच्या वक्तव्यावर पूर्ण विश्वास ठेवणे म्हणजे वेडेपणा असेल आपल्या सगळ्यांचा असा शब्दात त्यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडले.