अशोक गायकवाड

कर्जत : मावळ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे व कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रबोधन करणे व निवडणुकीमध्ये निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनाच्या प्रभावाखाली न येता मतदान करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकशाही बळकटीसाठी समाजातील सर्व स्तरातील जनतेचा सहभाग आवश्यक आहे .संपूर्ण भारत देशात सध्या लोकशाहीचा उत्सव निवडणुकीच्या माध्यमातून साजरा होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रबोधन करणे व निवडणुकीमध्ये निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनाच्या प्रभावाखाली न येता मतदान करणे या दृष्टीने स्वीप (सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन प्रोग्राम) कार्यक्रमांतर्गत सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी ३३ मावळ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे व कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली विधानसभा मतदारसंघ १८९ कर्जत मधील नेरळ तलाठी कार्यालयापासून नेरळ बाजार पेठ मध्ये भव्य प्रभात फेरी (रॅलीचे) आयोजन करण्यात आले होते.तसेचं नेरळ येथील धारप सभागृहात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्वीप अंमलबजावणी अंतर्गत ३३ मावळ लोकसभा मतदारसंघामधील १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघातील कर्जत तालुक्यातील कर्जत,नेरळ, चिंचवली,कडाव, कशेळे, कळंब पाथरज या महसुली मंडळात शहरी व ग्रामीण भागात आदिवासी वाडी वस्तीवर मतदार जनजागृती साठी प्रत्यक्ष दिव्यांग मतदार व ८५ अधिक वयोमान असणाऱ्या मतदारांच्या गृहभेटी घेऊन त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच सायकल रॅली व विविध रांगोळी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करून मतदान विषयी मतदारास प्रोत्साहन देण्याकरता विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत नेरळ येथे काढण्यात आलेली प्रभात फेरी( रॅली) मध्ये कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, नेरळ पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे , मंडळ अधिकारी नेरळ संतोष जांभळे , कळंब मंडळ अधिकारी अरुण विशे, चिंचवली मंडळ अधिकारी वैशाली पाटील, विकास गायकवाड अनिल कांबळे, उमेश कुमार भोरे, वैशाली मांटे माधुरी चौधरी तलाठी , नेरळ ग्रामसेवक कार्ले , अंगणवाडी सेविका ,अशोक भगत, दिपक पेरणे ,शासकीय कर्मचारी, महिला बचत गटातील महिला व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृतीच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *