भाईंदर : परदेशात नोकरी देण्याचा बहाण्याने विविध राज्यांतील लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी भाईंदर पूर्व येथील नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर पूर्व रेल्वे स्थानकासमोरील एक इमारतीत ईगल प्लेसमेंट सर्व्हिसेस यांचे कार्यालय होते. या कार्यालयाकडून परदेशात नोकरी देण्याचे प्रलोभन दाखविण्यात आले. त्याला भुलून विविध राज्यातील गरजूंनी कंपनीशी संपर्क साधला. या प्रत्येकाकडून ७० ते ८० हजार रुपये उकळण्यात आले. या सर्वांना विमानाची तिकिटे आणि व्हिसाही देण्यात आला. त्यांचा पासपोर्ट मात्र काढून घेण्यात आला. पासपोर्ट विमानतळावर देण्यात येईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र विमानतळावर गेल्यावर तिकीट रद्द झाले असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्व फोन बंद व कार्यालयाला कुलूप असल्याचे दिसून आले. आपण फसविले गेल्याचे समजल्यावर शंभरहून अधिक लोकांनी तक्रार केल्यानंतर नवघर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *