सोयगाव : अती गंभीर दुष्काळ जाहीर झालेल्या सोयगाव तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामावरील एक हजार आठशे ६४ मजुरांच्या खात्यात गुरुवारी ८६ लक्ष रु जमा झाले आहे त्यामुळे चार महिन्यातून पहिल्यादाच रोहयो मजुरांच्या मोबाईल वर रक्कम जमा झाल्याचे संदेश गुरुवारी दुपारी एक वाजेपासून प्राप्त झाले होते.
सोयगाव तालुक्यात पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेची आठशे दहा कामे मंजूर आहेत या कामांवरील मजुरांच्या हातांना मजुरी तर मिळाली होती परंतु डिसेंबर ते मार्च या चार महिन्यापासून मजुरीच्या पोटी एक रुपयाही मिळाला नव्हता परंतु सोयगाव तालुक्यातील रोहयो च्या कामावरील एक हजार ८६४ मजुरांच्या खात्यावर थकीत मजुरी गुरुवारी दुपारपासून सुरू होण्यास प्रारंभ झाला आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत ८६ लाख रक्कम रोहयो मजुरांच्या खात्यात वर्ग झाली आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यातील रोहयो मजुरांना दुष्काळात आधार मिळाला आहे
वाढीव दरा नुसार रक्कम
शासनाने रोहयो मजुरांना एक एप्रिल २०२४ पासून प्रति दिवस २७३ ऐवजी २९७ रु याप्रमाणे मजुरी देण्याचा निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी करत गुरुवारी जमा झालेल्या रक्कम मध्ये एक एप्रिल पासून रोहयो च्या कामावर असलेल्या मजूरांना प्रति दिवस २४ रु वाढीव दरा ने मजुरी अदा केली आहे त्यामुळे एक एप्रिल पासून रोहयो कामावर असलेल्या मजूरांना २९७ रु प्रति दिवस मजुरी मिळाली आहे सोयगाव चे गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, रोहयो अभियंता सचिन चव्हाण, राहुल राठोड, रोहयो कार्यक्रम अधिकारी दत्ता कटके गणेश गवळी,गजानन फरकांडे,प्रकाश मोकसरे,संगणक परिचालक सुरेंद्र निकम,आदींनी पुढाकार घेतला आहे.
