सोयगाव ते बनोटी मार्गावर शुकशुकाट तापमान ४३ अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण, रस्ते झाले सुनसान
सोयगाव :दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे.सोयगावचा पारा शनिवारी ४३ अंशावर पोहोचला आहे.त्यामुळे सोयगावात तापमानाने उच्चांक गाठल्याने दुपारी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंगाला उन्हाचे चटके बसत असत आहेत. त्यामुळे अनेक जण घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. त्यामुळे सोयगाव-बनोटी मार्गावर शुकशुकाट दिसत आहे. उन्हाचा तीव्र झळांमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. मनुष्यांसह पशुपक्षांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सोयगाव परिसरात दुपारी अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रस्त्यावर काम करणारे मजूर, प्रवासी वाहतूकदार, माल वाहतूकदांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम झाला आहे.
दहा वाजेपासूनच उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागत आहेत.सोयगाव परिसरात तीव्र उष्णता जाणवत असल्याने सोयगाव-बनोटी मार्गावर शुकशुकाट होता.त्यामुळे घरात आणि कार्यालयात दिवसभर पंखे लावून उन्हाच्या झळांपासून बचाव केला जात आहे, तर घराबाहेर जाताना टोपी, स्कार्प, गॉगल,सनकोट घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असा तज्ज्ञांकडून सल्ला दिला जात आहे. पंधरा दिवसापासून उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्याने रस्तेही निर्मनुष्य होवून तुरळक वाहने ये-जा करतांना दिसत आहेत. लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे नागरिक हैरान झाले आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाची तीव्रता अधिक
मागील वर्षी पेक्षा यंदा उन्हाची तीव्रता अधिक असून ऐन लग्न सराईत रस्ते निर्मनुष्य झाले आहेत सोयगावचे तापमान गुरुवार ते शुक्रवार ४१ अंशावर असताना शनिवारी अचानक तापमानात दोन अंशांनी वाढ झाली आहे.