आर्यनचे बळींचे सप्तक

ठाणे : आर्यन दलालच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबई क्रिकेट अकॅडमीच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्यामुळे यजमान स्पोर्टींग क्लब कमिटी संघाने सलग दुसरा मोठा विजय मिळवत ३७ व्या श्रीधर देशपांडे स्मृती टी -२० समरलीग क्रिकेट स्पर्धे च्या बाद फेरीत स्थान मिळवले. आर्यनने सात बळी मिळवत मुंबई क्रिकेट अकॅडमीला अवघ्या ४९ धावांवर गुंडाळल्यावर यजमानांनी ४.२ षटकात एका फलंदाजांच्या मोबदल्यात ५३ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा यजमानाच्या कर्णधाराचा निर्णय आर्यनने  एकदम सार्थ ठरवला. आर्यनने केवळ १९ धावांच्या मोबदल्यात सात फलंदाजाना माघारी पाठवले. आर्यनच्या गोलंदाजीसमोर मुंबई क्रिकेट अकॅडमीच्या दोघांच फलंदाजांना दुहेरी धावांचा पल्ला पार करता आला. विक्रम पैच्या १४ आणि अक्षत कांबळेच्या १० धावांमुळे मुंबई क्रिकेट अकॅडमीच्या खात्यात बऱ्यापैकी धावा जमा झाल्या. त्यांनतर शंकर सुब्रमणियमने १० चेंडूत तीन चौकार मारत नाबाद १६ धावा केल्या. तर पहिल्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या अथर्व अधिकारीने १३ चेंडूत पाच चौकारासह नाबाद २४ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक : मुंबई क्रिकेट अकॅडमी : १२ षटकांत सर्वबाद ४९ ( विक्रम पै १४, अक्षत कांबळे १० , आर्यन दलाल ४-१-१९-७, यश जठार ३-०-१२-२, तुषार कार्विझया २-०-६-१) पराभूत विरुद्ध स्पोर्टींग क्लब कमिटी : ४.२ षटकात १ बाद ५३ (शंकर सुब्रमणियम नाबाद १६, अथर्व अधिकारी नाबाद २४, शिवेन मिश्रा २-०-१९-१).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *