मुंबई : मे महिना सुरू होण्यापूर्वीच राज्यात उन्हाचा तडाखा भयंकर वाढला आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही उष्णतेची लाट धडकली आहे. गेले काही दिवस मुंबईच्या तापमानाने रविवारी पुन्हा उच्चांकी पातळी गाठली आहे. पुढील काहा दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी, यासाठी आरोग्य विभाग सरसावला आहे.
जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या, तुम्हाला तहान लागली नसली तरीही थोड्या वेळाने पाणी प्या. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचे रस यांसारखे घरगुती पेय प्यावे. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात. अशा सुचना आरोग्यविभागातर्फे करण्यात आल्या आहेत.
