नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगाव-चांदवड दरम्यान सकाळी पावणे दहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एसटी बसमधील चार प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही बस जळगावहून वसईकडे निघाली होती.

 जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वसई आगाराची ही बस होती. जळगावहून ती वसईला निघाली होती. सकाळी पावणेदहाला मालेगावहून ती नाशिककडे जात असताना हा अपघात झाला.

चांदवडलगतच्या घाटात देवी मंदिराच्या पुढे उताराचा रस्ता आहे. तिथे एका वाहनाला ओव्हरटेक करीत असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेक प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *