नवी मुंबई : आधुनिक काळातील महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहा. आयुक्त जयंत जावडेकर, लेखाधिकारी मारोती राठोड, प्रशासकीय अधिकारी उत्तम खरात आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आपली गावे स्वयंपूर्ण झाली पाहिजेत हा ध्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपला. त्या दृष्टीने ग्रामविकासाचे मर्म सांगणारी ‘ग्रामगीता’ लिहून समृध्दीचा मार्ग सांगितला. अंधश्रध्दा निर्मूलनासाठीही त्यांनी भजन, कीर्तनाचा प्रभावी वापर केला. आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेविषयी समाज प्रबोधन केले. अशा थोर राष्ट्रसंतांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.