Month: April 2024

नवी मुंबईतील स्वच्छताकर्मीही करताहेत मतदान करण्याविषयीचे आवाहन

नवी मुंबई : 25 ठाणे लोकसभा निवडणूक 20 मे रोजी संपन्न होत असून या निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार बजावावा यादृष्टीने व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती मोहिमेमध्ये विविध प्रसार माध्यमांचा वापर करण्यात येत असून त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. नवी मुंबई हे स्वच्छतेत देशामध्ये अग्रमानांकित असणारे शहर असून येथील सेवाभावी वृत्तीने काम करणारे स्वच्छताकर्मी दैनंदिन स्वच्छता कार्याप्रमाणेच विविध लोकोपयोगी उपक्रमातही मनापासून सहभागी होत असतात. या अनुषंगाने स्वच्छताकर्मींच्या गणवेशावर लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याविषयी नागरिकांना आवाहन करणारे बिल्ले (Badges) लावून त्या माध्यमातून मतदान करण्याविषयी संदेश प्रसारण करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील स्वच्छताकर्मींच्या गणवेशावर हे बिल्ले झळकत असून, त्यावर असलेल्या ‘मी मतदान करणारच. तुम्हीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावा. माझे मत माझा अधिकार’ – अशा मजकुरातून अभिनव पद्धतीने मतदान करण्याविषयीचे आवाहन केले जात आहे. याशिवाय महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारीही मतदान करण्याविषयीच्या जनजागृतीपर संदेशांचे प्रसारण करीत आहेत.

प्रचार अर्थपूर्ण व्हायचा तर…

मागोवा विठ्ठल जरांडे वादग्रस्त विधाने आणि कमरेखालचे वार यामुळे निवडणुकीची प्रचारपातळी खालावली आहे. झालेली आणि रखडलेली विकासकामे आणि त्यामुळे जनसामान्यांचे बाधित होत असलेले आयुष्य हा प्रचारसभांमधील हुकमी मुद्दा ठरु शकतो.…

राजस्थानचे आकर्षक किल्ले

राजस्थानचे नाव घेताच राजवाडे आणि किल्ले आठतात. या शहरामध्ये तुम्हाला प्रेक्षणीय स्थळांपासून खरेदीपर्यंत अनेक ठिकाणे पाहायला मिळतील. हे शहर ऐतिहासिक किल्ल्यांसाठी जगप्रसिद्ध तर आहेच पण त्यांचा इतिहाससुद्धा जाणून घेण्यासारखा आहे.…

सर्वच पक्षांनी विचार करणे गरजेचे…

काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केलेला निवडणूक जाहीरनामा, त्यांच्या नेत्यांनी विविध सभांमध्ये केलेली अर्थविषयक विधाने, आणि त्यातच काँग्रेसच्या परदेशातील शाखांचे दायित्व असलेले गांधी घराण्याचे निकटवर्तीय सॅम पित्रोडा यांनी केलेले विधान यामुळे देशातील…

निवडून दिले तर कोकणचा कॅलिफोर्निया करणार-राणे

रत्नागिरी : कोकणात बेरोजगारीची समस्या मोठी आहे, त्यामुळे भविष्यात कोकणात मोठे उद्योगधंदे आणून रोजगार देणार, मला जर निवडून दिलात तर कोकणचा कॅलिफोर्निया करणार अशा शब्द भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी कोकणवासीयांना दिला. नरेंद्र मोदींना…

सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा उबाठा- शिंदे

छत्रपती संभाजीनगर : सर्वात फास्ट रंग बदलणारा सरडा अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, लाव रे तो व्हिडिओ म्हणत एकनाथ शिंदेनी भरसभेत उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ दाखवला.…

ठाण्यात विचारेंनी अर्ज घेतला: महायुतीत अजुनही सस्पेंस

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होताच आज राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. मात्र महायुतीतील भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नेमका कोण उमेदवार उभे राहणार याबाबत अद्यापही संस्पेंस कायम आहे. एकीकडे राजन…

दुसऱ्या टप्प्यात राज्यात  ५३.५१ टक्के  मतदान 

मुंबई :  महाराष्ट्रात शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात झालेल्या  लोकसभेच्या आठ जागांवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३. ५१ टक्के मतदान झाले. काही तुरळक  घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. काही ग्रामस्थांनी त्यांच्या अडचणीमुळे मतदानावर बहिष्कार टाकला. काही…

दुष्काळात महाराष्ट्राला मदत करणाऱ्या अमुलवर मोदींनी खटला भरला- पवार

सोलापूर : दुष्काळात महाराष्ट्राला मदत करणाऱ्या अमुल कंपनीवर गुजराच्या तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी खटला भरला होता असा खळबळजनक आरोप शरद पवार यांनी केला आहे. दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना आमच्या विनंतीनुसार…